आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. कित्येक लोकांचा तर व्यवसाय आपल्या वाहनांवरच अवलंबून असतो, तर कित्येक आपलं स्वतःचं वाहन असावं असं स्वप्न पाहतात. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हाताशी नसते. पण आता पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाहन कर्ज योजनेंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी!
सज्ज व्हा आपले आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी! वाहन कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.