अनेकवेळा काही वैयक्तिक कारणांकरिता पैशांची गरज भासते, ही गरज अल्प कालावधीसाठी असते. अशा प्रकारची तुमची गरज भागविण्यासाठी संस्था वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते.
तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच शाखेशी संपर्क करा.
आपल्याला हे माहित आहे का की आपला पगारसुद्धा तारण म्हणून ठेवता येतो. पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतची पगारतारण कर्ज योजना देते आपल्याला मोठा फायदा. कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज.
आपल्याला अनेकवेळा काही कारणासाठी, कमी कालावधीसाठी पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्याकडे जितकं सोनं, तितकं कर्ज उपलब्ध करून देते पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत.
आपल्या स्वप्नांचे महत्व आम्ही जाणतो व ते सत्यात उतरविण्यासाठी तुमच्या बरोबरही उभे राहतो. वाहन खरेदीसाठी संस्था सातत्याने कमीत कमी कागदपत्रात व तात्काळ कर्ज मंजुरीसह कर्ज देते.
स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक सर्वात फायद्याची असे म्हंटले जाते. त्याप्रमाणे स्थावर मालमत्ता अचानक येणाऱ्या आर्थिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठीही उपयुक्त ठरते.
अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतांना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरा जातो. त्यांची प्रगती पैशांअभावी थांबू नये त्यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतचे शेतकऱ्यांना कमी कागदपत्रांसह त्वरित कर्ज उपलब्ध.
आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर संस्था देते तात्काळ मुदत ठेव तारण कर्ज.
महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज.
तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत आहे तुमच्या पाठीशी. तुमच्या व्यवसायासाठी साथ देत आहे कॅश क्रेडिट लोन.