आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते. अशा वेळी तुम्हाला साथ देते पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत!
आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचं आणि गरजांचं महत्व आणि म्हणूनच संस्था तुम्हाला उपलब्ध करून देते पगार तारण कर्ज; ज्यात तुमच्या येणाऱ्या पगारावर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज मिळवून दिले जाते व वेळीच तुमची गरज पूर्ण करण्यासाठी हातभार लावला जातो.
तुम्ही नोकरदार असाल तर गरजेच्या वेळी पगाराची वाट पाहू नका. पगार तारण कर्जासाठी व त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.