Pune Nagari Patsanstha
Home / About
banner
Our Head Office

Office no 102, Dwarika Bunglow Ravindra Hsg Soc near Treasure park sahakar nagar 2 Pune 41109.

Call Center No : 9090799191
संस्थेविषयी

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 2013 साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतचा बघता-बघता एक लाखा हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत पतसंस्थेची शाखा महाराष्ट्र राज्यात आहेत.


ISO 9001:2008 मानांकन मिळवून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत पतसंस्थेने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.