व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच पुणे नागरी सहकारी पतसंस्थेची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Tenure | Int Rate | Senior Citizen |
---|---|---|
3 Months | 5% | 0.50% |
6 Months | 6% | 0.50% |
9 Months | 7% | 0.50% |
12 Months | 8% | 0.50% |
13 Months & above | 9% | 0.50% |