Pune Nagari Patsanstha
Home / Deposit / Shubhmangal Thev Yojana
शुभमंगल ठेव योजना
शुभमंगल ठेव योजना

मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो. त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहू नये, कुणाच्याही इच्छा-आकांक्षांना तडा जाऊ नये, हा सोहळा कायम एक अविस्मरणीय सोहळा व्हावा यासाठी अनेक कुटुंब तत्परतेने झटत असतात, त्यासाठी मोठा खर्च देखील करावा लागतो. अशात आपल्या बचती, घरातील दागिने, वेळप्रसंगी घर आणि शेतीदेखील विकल्याची उदाहरणं आपल्या ऐकण्यात आली असतीलच, मात्र वेळीच निर्णय घेऊन लग्नासाठी आतापासूनच पूर्वतयारी केली तर कुठलीही अडचण न येता लग्नाचा आनंददायी सोहळा अगदी सहज पार पाडता येईल.

आता मुलांच्या लग्नकार्याची चिंता सोडा, पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या शुभमंगल ठेव योजनेंतर्गत मुलाच्या/मुलीच्या जन्मानंतर रु.४५ हजार एकरकमी गुंतवले तर १८ वर्षानंतर तुम्हाला रु.४ लाख मिळतात. ही रक्कम आपल्यावरील आर्थिक भार खूप हलका करेल व तुमचे आनंदाचे क्षण कुठल्याही आर्थिक व्यत्ययाशिवाय आनंदाने पार पडतील. शुभमंगल ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी सपर्क साधा.

ठेव & योजना
कर्ज & योजना