आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खातं असणं फार आवश्यक आहे. या खात्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक बचत खाते आणि दुसरे चालू खाते.
बचत खाते या नावातच याचा अर्थ दडला आहे. मिळणारी रक्कम अथवा कमाई बचतीच्या स्वरुपात ठेवण्यासाठी म्हणून बचत खाते वापरले जाते. या खातेदारांना व्याज देखील मिळते. प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा असतो.
चालू खाते मुख्यतः व्यावसायिकांसाठी असते. व्यावसायिक उद्देशासाठी व दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी व्यवसायाच्या नावाने बँकेमध्ये चालू खाते उघडणे बंधनकारक आहे. या खात्याद्वारे व्यवसायाला मुबलक अशा अनेक सुविधा बँक व्यावसायिकांना पुरवते
तर हा होता बचत खाते व चालू खाते यांच्यातील मुख्य फरक. आता वेळीच निर्णय घ्या आणि आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार सुलभ व सुरक्षित करण्यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपले बँक खाते उघडा.